- आपलीही फसवणूक झाली? साधा पोलिसांशी संपर्क…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२२) :- अहमदनगर येथील हॉटेल व्यवसायिक यांना हॉटेलच्या नुतनीकरणासाठी पाच कोटींची आवश्यकता होती. त्यांना कर्ज देतो असे सांगत, आरोपीने प्रोसेसिंग फीच्या नावाखाली आणि अॅडव्हांस हप्ता म्हणून २ लाख ४५ हजार रुपये घेतले. मात्र कर्ज दिले नाही.
फसवणूक झाल्यामुळे अमोल माणिकराव पाचपुते (रा. काष्टी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली. कोल्हापूर येथून आणखी इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बालाजी उर्फ एकनाथ बळीराम घोडके (वय ३२ रा. यवत), संग्रामसिंह अरुणराव यादव (वय ४६ रा. कोल्हापूर) व राजविर ऊर्फ हसन अकबर मुजावर (वय ३० रा. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता तब्बल १८५ व्यक्तींची त्यांनी फसवणूक केल्याचे समजले. आरोपींकडून १८५ बँकाचे चेक, कर्ज काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे, मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आरोपींकडे कोणताही परवाना नसताना ते नागरिकांना मोठ्या रकमेचे कर्ज देण्याचे आमिष दाखवत होते. लोकांची गरज ओळखून ते कोट्यावधीचे कर्ज देण्याचा बहाणा करत लाखो (fraud gang arrested) रुपये हे प्रोसेसींग फीस साठी घ्यायचे व कर्ज द्यायचे नाहीत. अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर नागरिकांनी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चार येथे संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा चारचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, सहायक पोलीस निरीक्षक नारायण जाधव, संजय गवारे, पोलीस हवालदार प्रविण दळे, (fraud gang arrested) आदिनाथ मिसाळ रोहिदास आडे, पोलीस नाईक वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाये, पोलीस शिपाई तुषार काळे, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय तुंगार, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, पोपट हुगले यांनी केली.