न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२२) :- चिंचवड एमआयडीसीतील अग्रवर्ती प्रोसेस इंजिनिअर्स प्रा.ली. मध्ये ओढ्याच्या बाजूने चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून एक लाख ९८ हजार ७१२ रुपये किमतीचे दोन इबारा पंप चोरट्यांनी चोरून नेले.
हा प्रकार शुक्रवारी (दि. ३०) रोजी घडला. सुनील विनायक शिंपी (वय ५०, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
















