- डायल ११२ ला कॉल करून पोलिसांना दिली खोटी माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर २०२२) : मुंबई व रेल्वे स्टेशनवर बॉम्ब स्फोट करणार आहे. मोदी साहेब पंतप्रधान यांनाही मारण्याचा कट आहे, अशी खोटी माहिती आरोपीने डायल ११२ वर कॉल करून दिली.
पोलिसांनी आरोपीला खोटी माहिती का दिली? असे विचारले असता आरोपीने पोलीसांना धक्काबुक्की करुन शासकीय कर्तव्य बजावित असताना कर्तव्यात अडथळा निर्माण केला. पलायन करण्याच्या तयारीतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
हा प्रकार मंगळवारी (दि ४) रोजी सायंकाळी साडेसात वाजत क्रांती चौक, गणेश कॉलनी, विजय नगर, देहुरोड येथे घडला. याप्रकरणी पोलीस नाईक अशोक वसंत पारधी यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज अशोक हंसे (रा. क्रांती चौक, गणेश कॉलनी, विजय नगर, देहुरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.