न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- घराच्या दरवाजाला लॉक लावून फिर्यादी व त्यांची आई देहु फाटयाजवळील बँक ऑफ इंडिया येथे गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांच्या घराचे लॉक तोडून आत प्रवेश केला.
दोन्ही बेडरुममधील लाकडी व लोखंडी कपाटातील १,३०,००० रुपये रोख व साडे अकरा ग्रॅम वजनाचे २७,००० रुपये किमतीचे वेगवेगळे सोन्याचे दागिने असे एकूण १,५७,००० रोख रक्कम व सोन्याचे दागिने घरफोडी करीत चोरी करून चोरून नेले आहेत.
ही घटना (दि. १०) रोजी २ ते दोन वाजून चाळीसच्या दरम्यान काळे कॉलनी, लेन नं. १, पुणे-आळंदी रोड, चोविसावाडी, च-होली बु, येथे घडली. याप्रकरणी केतन राजेंद्र भोंडवे (वय ३२ वर्षे, रा. काळे कॉलनी, लेन नं. १, पुणे आळंदी रोड, चोविसावाडी, चहोली बु) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.















