न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२२) :- १७ वर्षीय मुलाने फिर्यादी यांच्या पिडीत १६ वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन तिच्या अंगाशी लगट करीत तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने जबरी संभोग केला.
हा प्रकार (दि. ७) रोजी सकाळी ७.०० वा. ते दुपारी १.३० वा च्या दरम्यान अॅम्बीयंस हॉटेल/लॉज काळाखडक वाकड येथे घडला. फिर्यादी (वय ३८ वर्षे, रा. के/ऑफ गिते, सर्व्हे नं. १२७ लक्ष्मी कमल निवास, चौधरी पार्क, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विधीसंघर्षीत बालक (वय १७ वर्षे १० महिने, रा. के/ऑफ सुंदर जगदाळे, गजानन कॉलनी, ताथवडे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.















