न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२२) :- भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर आहे. पुराणातही या मंदिराचा महिमा सांगण्यात आलाय. याच उज्जैनमधील महाकालेश्वर कॉरिडॉरचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. सहाशे कलाकार आणि साधू संतांच्या मंत्रोच्चारासह या कॉरिडोअरच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
या सोहळ्याचे लोन प्राधिकरणात पोहोचले. प्रभाग क्र. १५ भाजपाच्या माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, निगडी-प्राधिकरणातील विविध सामाजिक, धार्मिक संघटना मंगळवारी (दि. ११) रोजी सायंकाळी एकत्र जमल्या. सेक्टर नं. २८ येथील महादेव मंदिरात देवाचं दर्शन घेत पूजा करण्यात आली. ठीक पाच वाजता भगवान शंकराची भव्य दिव्य आरती करण्यात आली. ” हर हर महादेव’ ‘ चा नारा सर्वत्र गुंजला होता.
महाकाल कॉरिडोअरच्या उभारणीने धर्मनगरी उज्जैनला नवी ओळख मिळणार आहे. महाकाल प्रांगणात सुमारे दोनशे लहान मोठ्या मूर्ती आणि १०८ स्तंभ तयार करण्यात आलेत. दुसऱ्या टप्प्याचे काम २०२३-२४ पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुढाकार घेत आहेत, अशी माहिती माजी उपमहापौर शैलजाताई मोरे यांनी दिली.















