- व्यवस्थापन व अध्यात्म विषयावर परिसंवाद
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रु.) :- चऱ्होली येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ़ मॅनेजमेंट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रवास-३-व्यवस्थापन व आध्यात्मिक” या विषयावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. वाल्मिकी सरवदे, डॉ. विवेक काटदरे, औद्योगिक प्रशिक्षक दिनेश नथाणी, डॉ. प्रशांत गुंडावार, डॉ. यशवंत वैश्यपायन, डॉ. श्याम सुमन, डॉ. बी. एस. सावंत आदी उपस्थित होते.
डॉ. सरवदे म्हणाले की, दैनंदिन जीवनात व्यवस्थापन गरजेचे आहे. या व्यवस्थापनाला अध्यात्माची जोड दिल्यास जीवनात परिवर्तन घडून येईल.
कुलगुरू डॉ. खेडकर म्हणाले की, अध्यात्म हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. अध्यात्मामुळे मनावर ताबा मिळवणे शक्य होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चेतन खेडकर, प्रा. शीतल जळगावकर यांनी तर आभार डॉ. लांडे यांनी मानले.











