- अपघातात १५ विद्यार्थी जखमी; दोघांना गंभीर दुखापत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२२) :- रायगडमध्ये माणगावजवळ शाळेच्या सहलीच्या बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. निगडीतील ज्ञान प्रबोधनी स्कूलच्या शाळेतील विद्यार्थी रायगडमध्ये सहलीला गेले होते. माणगाव ते किल्ले रायगड रस्त्यावर घरोशी वाडी इथे त्यांच्या बसला अपघात झाला. घरोशी वाडी इथल्या रस्त्याच्या बाजूला बस १५ ते २० फूट खाली कोसळली. या अपघातात १५ विद्यार्थी जमखी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले रायगडला सहलीसाठी आलेल्या खासगी मिनीबसला माणगाव तालुका हद्दीतील घरोशी वाडी येथे भीषण अपघात झाला आहे. ज्ञान प्रबोधनी शाळेमधील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी रायगड सहलीला आले होते. किल्ले रायगडाला भेट दिल्यानंतर शाळेचे विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थ्यांची बस परतीच्या प्रवासादरम्यान हा अपघात झाला आहे. पुण्याकडे जात असताना घरोशी वाडी घाट रस्त्याच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट शाळेची मिनीबस पंधरा ते वीस फूट दरीत कोसळली. सुदैवाने ही बस झाडात अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
दरम्यान, या अपघातामध्ये १५ विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. तर दोन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर सात जण जखमी झाले आहेत.