न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२२) :- कंपनीच्या गोडाऊनचे शटर लॉक तोडुन अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. कंपनीच्या गोडाऊन मधून एकण २,७०,००० रुपये किंमतीचे कॉपरचे बॉक्स असलेले ३ वुडन पॅलेट चोरून नेले.
हा प्रकार (दि. ७) रोजी रात्री दहा ते सकाळी ८ वा चे दरम्यान चिंबळी येथील गट ४४ मधील युनियन ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस कंपनीच्या गोडाऊनमध्ये घडला.
फिर्यादी विनोदकुमार अमिरसिंग पुनिया (वय ३८ वर्षे, रा. फ्लॅट नं ३५ बी विंग, ग्लोरियर्स पार्क, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.