न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्र बाळगण्यास बंदी असताना आरोपीने लोखंडी कोयता जवळ बाळगला. रस्त्याच्या कडेला गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने उभा असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
पोलिसांनी (दि. ११) रोजी ३:३० वा. चे सुमारास डांगे चौक ते ताथवडेकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला ही कारवाई केली. गुन्हे शाखा युनिट-४ चे पोलीस शिपाई यांनी वाकड पोलिसात फिर्याद दिली असून आरोपी अभिषेक अमरदास यादव (वय २३ वर्षे रा. कृष्णा कॉलनी, रहाटणी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















