उत्तर भारतीय स्नेह सम्मेलन उत्साहात साजरे
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रु.) :- उत्तर भारतीय सभा आणि सार्वजनिक विकास मंच, पिंपरी चिंचवड च्या वतीने आयोजित उत्तर भारतीय स्नेह सम्मेलन उत्साहात साजरे झाले. काळेवाडी – रहाटणीतील बळीराज मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या या सम्मेलनात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य व योगदान दिलेल्या मान्यवरांचा उत्तर भारतीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदी व भोजपुरी गीतांच्या रंगारंग कार्यक्रमाने आणि युवा कवि संमेलनच्या आयोजनाने उपस्थितांचे मने जिकली.
या कार्यक्रमात जिव्हाळा बाल संगोपन गृह आणि पुनरुत्थान समरसता गुरुकुलम आश्रमच्या मुलांना चादर, शैक्षणिक साहित्य व मिठाई वाटप करण्यात आली. यावेळी रिटायर्ड कर्नल डॉ ए. के पांडे, डॉ राकेश प्रसाद, डॉ रेखा दुबे, अभिनेता अरुण सिंह उर्फ भोजपुरिया काका, देव सिंह, महेश राजा, सुबोध सेठ, प्रेमरंजन दुबे, अभिनेत्री लीना आचार्य, अंजना मित्तल, गीता, सोनी सिंह, डिजाइनर नीतू भारद्वाज, प्रियंका शर्मा, डॉ रचना पांडे, शिखा झा, खिलाड़ी वसीम यूसुफ शेख, युवा कवि व ‘नवभारत’ संवाददाता आशीष शुक्ला ‘सजल’, आंनद सिंह ‘निषंग’, आरोही श्रीवास्तव, सत्यम श्रीवास्तव आदींना उत्तर भारतीय गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते विजय गुप्ता यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उत्तर भारतीय समाज एकसंघ व एकत्रित आणण्याचे काम उत्तर भारतीय सभा आणि सार्वजनिक विकास मंच करीत आहेत. ज्यायोगे आपल्या बांधवाच्या अडी-अडचणी समजून घेऊन, त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी मदत होत आहे. त्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजण करणे आवश्यक आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर भारतीय सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयप्रकाश सिंह, शहराध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक संतोष ओझा, शिवसेना नेते विजय गुप्ता, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकिर, नगरसेविका सुनीता तापकिर, सविता खुळे, निर्मला कूटे, नीता पाडाळे, नगरसेवक अभिषेक बारणे, विनोद तापकिर, संदीप नखाते, गोपाल मळेकर, प्रीति विक्टर, माजी नगरसेवक धनराज बिरदा, हरेश तापकिर, कैलास थोपटे, तात्या तापकिर, संतोष बारणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी अभिषेक ओझा, मुसाफिर गिरी, धर्मेंद्र शर्मा, नेमचंद विश्वकर्मा, ऑगस्टा आंनद, धीरेंद्र शर्मा, तहसीन खान, आशुतोष दुबे, हरिशंकर यादव, मिन्हाज खान, गोकुल ओझा, कमलेश यादव, रामायण सिंह, रामाशीष साहनी, दीक्षांत देव उपाध्याय, अरुण शुक्ला, भरत सिंह, राजीव पाठक, केशव शर्मा, रामजीत यादव, रणधीर शर्मा, मनन सिंह, सीताराम शहा, इसराद अंसारी, शिवकुमार सिंह, भोला ओझा, प्रमोद गिरी, अमरुल्लाह मानसुरी, योगेश सिंह, शशिकांत पासवान आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे निवेदन गीता, तर संदीप गोडांबे यांनी मानले.










