न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२२) :- डिमार्टमध्ये घरगुती वस्तुंची खरेदी करुन फिर्यादीसह त्यांच्या दोन मैत्रिणी फुटपाथवरुन पायी चालत घरी निघाले होते. शिवाजी चौकाकडे जात असताना आरोपीची चारचाकी गाडी भरधाव वेगाने येताना त्यांना दिसली. आरोपीने त्याची गाडी फुटपाथवर चढवली. फिर्यादीसह त्यांच्या मैत्रिणींना आरोपीच्या गाडीने जोरात समोरुन धडक दिली.
ते तिघेही खाली पडले. त्यामध्ये फिर्यादी व त्यांची एक मैत्रीण बाजुला पडले. दुसऱ्या मैत्रिणीला जोरदार धडक बसल्याने त्या फुटपाथवरुन रोडवर खाली पडल्या. आरोपीने गाडी न थांबवता गाडीसह तिला फरफडत नेऊन गंभीर जखमी केले. हा प्रकार (दि. १०) रोजी १०:४५ वा च्या सुमारास बाटा शोरुमसमोर, डीमार्ट शेजारी, हिंजवडी-वाकड रोडवर घडला.
रुषीकेश श्रीकांत राजे (वय २५ वर्षे, रा. वरघराज बिल्डींग फ्लॅट नं. ३ सुदर्शन हॉस्पीटल जवळ पिंपळे गुरव, सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी क्वीड गाडी (एम.एच १२ एस.ई. ४६००) वरील चालक हर्ष मोहन सिंग (वय ३४ वर्षे रा. प्लॅट नं. ए/४०४ माऊंडवर्ड कॉर्सीका, बालेवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















