न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२२) :- व्हॉट्सअप कॉल करुन फिर्यादीच्या पत्नीला व त्यानंतर फिर्यादीला दुप्पट पैसे परत देण्याचे आमिष दाखवले. फोन पे वरुन वेळोवेळी फिर्यादीकडुन तीन लाख रक्कम घेऊन पैसे परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली आहे.
ही घटना (दि १७/०१/२०२२) रोजी सकाळी १०.०० वा ते रात्री १०.०० वाजता घडली. फिर्यादी प्रशांत भिकाजी साळुंके (वय ५० वर्षे, पत्ता घर नंबर ११९, ज्ञानेश्वर पिठाची गिरणीच्या पाठीमागे, लेन नंबर ३, जयमालानगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अनोळखी इसम (नांव, पत्ता महीती नाही, मो. नंबर ९७७५९०४३८०) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















