न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- उबेर रिक्षाचे भाडे घेवुन फिर्यादी रिक्षाचालक चालले होते. त्यावेळी फिर्यादीच्या अॅटो रिक्षाचा पाठलाग करीत दोन अनोळखी इसम फिर्यादीच्या जवळ आले.
फिर्यादी यांना रिक्षातुन बाहेर काढुन दोघांनी त्यांच्या कमरेच्या बेल्टने फिर्यादीच्या तोंडावर, अंगावर हाताने लाथाबुक्कयाने मारहाण केली. त्यांच्यातील एकाने फिर्यादीच्या ताब्यातील ३०,००० रुपये किंमतीची अॅटो रिक्षा (एम.एच. १२ क्यू.ई. २४०४) काळया-पिवळ्या रंगाची जबरदस्तीने घेवून निगडीच्या दिशेने गेले.
हा प्रकार (दि. १३) रोजी रात्री १२.४० वा चे सुमारास स्टार हॉस्पटल समोर, जुना पुणे ते मुंबई सार्वजनिक रोडवर, खंडोबामाळ चौक, आकुर्डी येथे घडला. फिर्यादी इम्रान अब्दुलरशिद शेख (वय ३५ वर्षे, रा गोल्डन चौक, अनमोल बेकरी, ताजीम शेख बेकरीच्या रुममध्ये, बोपोडी) यांनी निगडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी दोन अनोळखी इसम (वय अंदाजे २० ते २५) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
















