न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- कार्तिकी यात्रा संजीवन सोहळ्यानिमित्त शहरातून हजारो नागरिक दर्शनासाठी आळंदीला दाखल होतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीकडून जादा बसची सुविधा देण्यात आली आहे. १९ ते २२ नोव्हेंबर दरम्यान ही सुविधा उपलब्ध असून निगडी आगारातून सुमारे ४० जादा गाड्यांचे नियोजन असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वेगवेगळ्या आगारातून आळंदीसाठी जादा बसचे नियोजन केले जाते. पीएमपीच्या ४० बसमध्ये चालक वाहकांसह सुमारे २५० पेक्षा अधिक कर्मचारी याचे संयोजन करणार आहेत. निगडी पीएमपीएमएल आगारातून ८० चालक-वाहक यामध्ये आपली सेवा देणार आहेत. जादा बसची सुविधा देताना तिकिट दरवाढ करणार नसल्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने भाविकांना दिलासा मिळाला आहे. यात्रेच्या काळात किंवा इतर वेळी होणारी पाच टक्के तिकीट दरवाढ करण्यात येणार नाही.
पीएमपीकडून देहू ते आळंदी, पिंपरीगाव ते आळंदी, निगडी ते आळंदी, चिंचवडगाव ते आळंदी, हिंजवडी ते आळंदी या मार्गावर जादा बसची सुविधा दिली आहे.
















