न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- अज्ञात चोरटयाने कंपनीच्या भिंतीवरुन चढून आतमध्ये प्रवेश केला. कंपनीच्या स्टोअरमधील पॉलीकॅब वायर, एमसीबी हा पार्ट, अॅल्युमिनियमची सिट असा एकुण ८,३४,५०१ रुपये किंमतीचा माल चोरुन नेला आहे.
ही घटना (दि. ९) रोजी ६.३० वा ते (दि. ११) रोजी ९.३० वा. दरम्यान यशवंत कोटींग इंडीया प्रा लि. प्लॉट नं पीएपी-ए-२९/२२-२३ एमआयडीसी चाकण फेज ४, निघोजे येथे घडली.
फिर्यादी नितीन देविदास नाबदे (वय ३६ वर्षे, रा. कृष्णानगर, शिवसदन ए-१७/८ सेक्टर २०, चिंचवड) यांनी चाकण (म्हाळुंगे चौकी) येथे फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















