- सुनेकडून पती आणि सासऱ्याविरोधात पोलिसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- पतीच्या विवाहबाहय संबंधास नकार दिल्याने आरोपी पतीने फिर्यादीला मारहाण, शिवीगाळ केली. आरोपी पती महिलेस घेवुन खेडमध्ये राहण्यास गेला. त्यावेळी फिर्यादीच्या सासऱ्याने ” तुझ्या नव-याला बाहेरचा नाद लागला आहे, तो काय एवढया रकमेचे कर्ज फेडु शकत नाही, मी तुमचे दोघांचे कर्ज फेडतो, तसेच त्याच्या नावावरती माझी जमिन करतो; मला तुझे वेड लागले आहे, मला तु खुप आवडतेस, तुझा नवरा आता काय परत तुझेकडे येणार नाही, तु मला आनंदी ठेवले तर मी तुला व तुझ्या मुलांना आयुष्यभर आनंदी ठेवेल ” असे म्हणून फिर्यादीला नको तिथे स्पर्ष करून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न केली.
फिर्यादीने त्यांच्या नवऱ्याला सासऱ्याने केलेल्या अत्याचाराबद्दल सांगितले असता ” माझा बाप माझ्या नावावरील कर्ज फेडणार आहे; तु त्यांना खुष कर, मला तुझ्यात रस राहिला नाही” असे म्हणुन फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेवून फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न केली.
हा प्रकार २०१८ पासुन ते दि.११/११/२०२२ पर्यंत प्लॅट नं. ७०५, निसर्ग अपार्टमेंट, नवीन अथर्व हॉस्पीटल जवळ, तळेगाव दाभाडे येथे घडला. २९ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी पती रामदास बबनवर घोजगे (वय ३४ वर्षे), सासरा बबनवर वरसु घेजगे (वय ७५ वर्ष, दोघे रा. आंबी, तळेगाव एमआयडीसी रोड, ग्रीन पार्क हॉटेल समोर आंबी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















