- बेजबाबदार ठेकेदाराकडून पदपथाच्या दुरुस्ती व्हावी; संतोष सौंदणकरांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपूल ते त्रिवेणीनगर रस्त्यावरील बजाज कंपनीच्या प्रवेशद्वाराच्या विरुध्द दिशेला अर्बन स्ट्रीटद्वारे फुटपाथचे काम करताना महावितरणची विद्युत केबल तुटल्याने या भागात विजेचा खोळंबा झाला. विद्युत केबल दुरुस्त केल्यानंतर महापालिकेने फुटपाथवर पेव्हींग ब्लॉक न बसविल्यामुळे अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार तयार केलेल्या पदपथाची वाट लागली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील प्रमुख मार्गावरील दोन्ही बाजुचे पदपथ अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार विकसित करण्यासाठी करोडो रुपयांची कामे काढली. त्याअंतर्गत निगडीतील मधुकर पवळे उड्डाण पूल ते त्रिवेणीनगरकडे जाणा-या मार्गावर दोन्ही बाजुला पदपथ आधुनिक पध्दतीने विकसित केले आहेत. हे काम करताना बजाज ऑटोकंपनीच्या प्रवेशद्वारावर विरुध्द दिशेला महावितरणची विद्युत केबल तुटली.
त्यामुळे यमुनानगरचा विद्युत पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला. त्यावर शिवसेनेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी महावितरण व्यवस्थापनाशी संपर्क साधून ही समस्या सोडविण्याची विनंती केली. त्यावर महावितरणच्या कर्मचा-यांनी खोदकाम करून विद्युत केबलची दुरूस्ती केली. त्यानंतर युमानगरमधील विद्युत पुरवठा सुरळीत झाला. हे काम केल्यानंतर महापालिकेने फुटपाथवर पेव्हींग ब्लॉक बसविले नाहीत. त्यामुळे पदपथाची दुरवस्था झाली आहे.
स्थापत्य विभागांतर्गत पदपथाची कामे करताना विद्युत समस्येबाबत पालिकेने महावितरणला कळवले नाही. केबल दुरुस्ती करताना पेव्हींग ब्लॉक काढण्यात आले. त्याची दुरूस्ती महापालिकेने संबंधित ठेकेदाराकडून करुन घ्यावी. पेव्हींग ब्लॉक निघाल्यामुळे दुरवस्था झाली आहे.
– संतोष सौंदणकर, शहर संघटक (शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे)…


















