- चिखलीत वीस लाखांची घरफोडी; पोलिसात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट याठिकाणी फिर्यादी गेले होते. त्या दरम्यान फिर्यादीच्या घराचे उत्तर दिशेला असलेल्या खिडकीचे गज धारदार साधनाने कापुन त्यावाटे आत प्रवेश केला. पहिल्या मजल्यावरील बेडरुममधील कपाटाचे ड्रावर उचकटून त्यामध्ये ठेवलेले ११,२३,००० रुपये किंमतीचे सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने व ९,००,००० रुपये रोख रक्कम अशी एकुण २०,२३,००० रुपये किंमतीचे ४० तोळे व ४ ग्रॅम ४३ मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे.
ही घटना (दि ११) रोजी ६.०० वा ते (दि. १३) रोजी रात्री १२.१५ चे दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घरी, गट नंबर १५३२, सोनवणे वस्ती, महालक्ष्मी वजन काटयाशेजारी, चिखली येथे घडली.
फिर्यादी शरद पंडीत सोनवणे (वय ३३ वर्षे, रा. गट नंबर १५३२, सोनवणे वस्ती, महालक्ष्मी वजन काटयाशेजारी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















