न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२२) :- लोखंडी कोयता आरोपीने जवळ बाळगला. ज्याची किंमत तीनशे रुपये आहे. कोयत्यासह स्वतःचा फोटो ईस्टाग्रामवर व्हायरल केला. याबबत पोलिसांना माहिती मिळताच आरोपीला कोयत्यासह ताब्यात घेतले.
ही घटना (दि. १३) रोजी १.५० वा. चे सुमारास गुजरनगर, थेरगाव यथे घडली. फिर्यादी चंद्रकांत मोतीराम गवारी (वय ४३ पो. हवा./५०६, शस्त्र विरोधी पथक पिंपरी-चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी शुभम अभिमान जाधव (वय २१, रा गुजर नगर थेरगाव) याला अटक केली आहे. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.