न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातून आरोपी दोन वर्षाकरीता तडीपार आहे. पोलिस आयुक्तांच्या शस्र जवळ न बाळगण्याच्या आदेशाचे आरोपीने उल्लंघन केले. हातामध्ये लोखंडी तलवार घेवुन “मी फुलेनगरचा भाई आहे” असे म्हणत हवेत तलवार फिरवुन फुलेनगर भागात दहशत निर्मात केली.
ही घटना (दि. १५) रोजी सायं. ६.३० वा चे सुमारास महात्मा फुलेनगर कमानीजवळ, भोसरी येथे घडली. नितीन आप्पा खेसे एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याचे पोलीस शिपाई यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी चन्नाप्पा परशुराम सुतार (वय २३ वर्ष रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


















