- दिनेश यादव यांच्या पत्राची दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२२) :- कुदळवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीची वर्दळ असते. बीआरटी रस्त्यावरून बालघरे वस्तीकडे वळताना मुख्य रस्त्यावरील वाहने वेगात असतात. त्यामुळे अनेक वेळा अपघातचे प्रकार घडत होते. परिसरातील जेष्ठ नागरिक, महीला, शाळेतील मुले यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत होती.
स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी याबाबत बीआरटी विभागाकडे गतिरोधक बसविण्याची मागणी केली. अनेक वेळा पत्रव्यवहार केला. त्या कामाची दखल घेऊन बीआरटीने मुख्य रस्त्यावर थर्मोप्लास्टिक पेंट रंबलिंग स्ट्रिप (लहान गतीरोधक) बसविण्याची कार्यवाही केली. यावेळी बंजरग बालघरे, नाना बालघरे उपस्थित होते. बीआरटी अधिकारी कुटे यांचे यादव यांनी आभार मानले आहेत.


















