न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२२) :- किराणा दुकानाचे शटर कुलूपबंद असताना अज्ञात इसमाने दुकानाच्या छतावरील पत्रे व पियुपी सिलींग उचकटुन दुकानात प्रवेश केला. दुकानातील कॅश काउंटरच्या ड्रावरमध्ये ठेवलेली ७२,००० रुपये रोख रक्कम व विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तु दुकान फोडुन चोरी करुन नेल्या आहेत.
तसेच फिर्यादीच्या शेजारील क्लासिक फुटवेअर या दुकानाच्या पत्र्याचे छतही अशाच प्रकारे उचकटुन चोरीचा प्रयत्न केल्याचे फिर्यादेत म्हटले आहे. हा प्रकार (दि. १२) रोजी रात्री १०.०० ते (दि. १३) रोजी सकाळी ८. ०० वा.चे दरम्यान महात्मा फुले रोड, बापुजी बुवा चौकाजवळ, भोसरी येथील शिवाय किराणा व स्टेशनरी नावाच्या दुकानात घडला.
फिर्यादी चंद्रभान जय सिंग (वय २५ वर्षे, रा. वास्तु शिल्प, फ्लॅट नं. ६०१, बँक ऑफ महाराष्ट्रजवळ, दाभाडे वस्ती, च-होली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















