न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२२) :- ” हलके काम देतो, तु मला बाहेर भेट, माझ्या मनाप्रमाणे काम कर, तुला हवे ते मी देईन ” असे बोलून सहकारी महिलेला अमिष दाखविले. आरोपी फिर्यादीशी वांरवार जवळीक निर्माण करीत होता. तसेच ते फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा रितीने शारिरीक स्पर्श करीत होता. यामुळे फिर्यादीस खुप मानसिक त्रास होत होता.
फिर्यादी हे कामावर असताना आरोपी फिर्यादीजवळ आला व हाताला हात लावुन, फिर्यादीशी लगट करु लागला. फिर्यादीकडे शरिर सुखाची मागणी करुन फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असे फिर्यादेत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.७/०९/२०२२) रोजी फिर्यादी कामावर असताना सकाळी ११.०० वा. चे सुमारास मध्यवर्ती राज्य परिवहन कार्यशाळा, दापोडी येथील विद्युत विभागात घडला. महिला फिर्यादी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वासुदेव मोहिते (साठा विद्युत विभाग, दापोडी एसटी वर्कशॉप) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
















