- डायल ११२ नंबरवरून महिलेने घेतली होती मदत; पती गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२२) :- पतीकडून पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण होत आहे. महिलेला पोलीसांची मदत हवी आहे, असा कॉल डायल ११२ नंबरवरून पोलिस आयुक्तालयाला केला. पोलीस आयुक्तालयाने पिंपरी पोलीस स्टेशनला कॉलची पुर्तता करण्याची सूचना केली. त्यानुसार फिर्यादी हे सोबतच्या अंमलदारासोबत दिलेले कर्तव्य पार पाडत होते. त्या दरम्यान आरोपीने फिर्यादी यांना दुखापत करण्याच्या व कर्तव्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
फिर्यादीच्या चेह-यावर, दोन डोळ्यांच्या मध्यभागी, नाकावर हातातील मोबाईल हिसकावुन फेकुन मारला. फिर्यादीला जखमी करुन मारण्याची धमकी दिली. हा प्रकार (दि. १४) रोजी रात्री १०.३३ वा चे सुमारास अशोक टॉकीज जवळ, गणेश मंदिरा समोरील गल्लीत, पिंपरीगाव, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी पिंपरी पोलीस स्टेशनचे पो.ना. यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी आरोपी राजेंद्र हनुमंत गायकवाड (वय ५७ वर्ष रा. अशोक टॉकीज जवळ, गणेश मंदिरा समोरील गल्लीत, पिंपरीगाव) याला अटक केली आहे.


















