न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२२) :- आयुश्री हॉस्पीटलमध्ये फिर्यादी हे त्यांच्या मित्राला घेऊन थकबाकी असलेल्या पैशांचा हिशोब करण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपींनी पैसे न देता फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपीने फिर्यादीचा गळा पकडून मानेचा चावा घेतला.
तसेच ” तु परत हॉस्पीटलमध्ये पाय ठेवला तर तुला खल्लास करेन ” अशी धमकी दिली. हा प्रकार पिंपरीगाव येथील आयुश्री हॉस्पीटलमध्ये शुक्रवारी (दि. १८) घडला.
फिर्यादी ज्ञानेश्वर कृष्णा जाधव (वय २७ रा. काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विलास वसंत डांगे (वय ३३ रा. रहाटणी), आदिराज शिंदे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.