न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२२) :- फिर्यादी महिलेचे पती, दीर, सासू हे शनिवारी सकाळी कामावर गेले. त्यानंतर फिर्यादी महिला आणि त्यांची जाऊ अशा दोघी घरी होत्या. फिर्यादीची जाऊ देखील बाहेर गेल्यानंतर फिर्यादी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन नातेवाईक तरुणाने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला.
फिर्यादीने त्यास विरोध केला असता घडलेला प्रकार कोणास सांगितला तर फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादेत म्हटले आहे. ही घटना शनिवारी (दि. १९) दुपारी जाधववाडी चिखली येथे घडली. १९ वर्षीय पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या नातेवाईक तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत
















