न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२२) :- दोघांच्या मालकीच्या जागेचा विकसन करारनामा फिर्यादी आणि आरोपी यांनी करून त्याचे कुलमुखत्यारपत्र बनवले. महापालिकेच्या परवानगीने विकसित केलेल्या बांधकाम साईटवर फिर्यादी यांच्या मालकी हक्काचे आठ व्यावसायिक गाळ्यांमध्ये भागीदार आरोपी यांनी कोयत्याचा धाक दाखवून ताबा मारला.
सुरक्षा रक्षक आणि सुपरवायझरला धमकावून गाळ्यांना कुलूप लावले. त्या बांधकाम साईटवरून ३५ हजारांचे साहित्य आरोपीने चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार ११ जुलै ते १९ नोव्हेंबर या कालावधीत बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली. साहेबराव विठ्ठलराव तांबे (वय ७६, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळासाहेब बबन बोराटे (वय ५२, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत.
















