न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० नोव्हेंबर २०२२) :- पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. यामध्ये किमान ३० ते ४० वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर अग्निशमन दलाच्या २ रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एका टँकरचं ब्रेक फेल झाल्याने लागोपाठ ३० ते ४० वाहनं एकमेकांना धडकलीत. ही घटना आज रात्री साडे-आठ वाजेच्या सुमारास घडली. यापूर्वी नवले ब्रीजवर असेच साखळी अपघात झालेत. तरीही हायवे अथॉरिटीचं ठोस उपाययोजनांकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहेत.
















