न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२२) :- पेट्रोल पंपावर जमा झालेली नऊ लाख ९९ हजार ९३५ रुपयांची रोकड फिर्यादी यांनी ऑफिसमधील ड्रॉवरमध्ये ठेवली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने त्यातील आठ लाख ९३ हजार १३६ रुपयांची रोकड चोरून नेली.
हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. १९) रात्री पूर्णानगर, चिंचवड येथील भोसले पेट्रोल पंपावर घडली. विशाल जगन्नाथ भोसले (वय ३८, रा. चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
















