न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०२२) :- चाकण (म्हाळुंगे) च्या खराबवाडी येथील वाण्याचा मळा येथे झुडुपात २५ ते २७ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून डोक्यात दगड घालण्यात आला आहे.
अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली असून अनैतिक संबंधातून महिलेचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिस कर्मचारी हनुमंत वसंत बांगर यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात आरोपीचा शोध गुन्हे शाखा युनिट तीन आणि म्हाळुंगे पोलिस घेत आहेत.
















