पिंपरीतील जमतानी चौकातील घटना; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२२) :- सात जणांच्या टोळक्याने तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत दगडांनी हल्ला केला. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना पिंपरीतील जमतानी चौक येथे घडली.
नितीन गुरुमुखदास नागदेव (रा. शगुन चौक, पिंपरी) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार आदेश उमाप, स्वप्नील चंदनशिवे, प्रतीक जम, सुजल कांबळे, निखिल कांबळे, ओंकार खैरमोडे, आदित्य जाधव (सर्व राहणार पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हे जमतानी चौकातून जात असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. लाथा बुक्क्यांनी व दगडांनी मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















