न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह बुधवार दि. २३ नोव्हेंबर ते दि. २६ नोव्हेंबर पर्यंत रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा तात्पुरता पदभार अतिरिक्त आयुक्त-१ प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आयुक्त सिंह यांनीच काढला आहे.
महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ १२ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला आहे. त्यानंतर राज्य शासनाने महापालिका आयुक्तांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या शेखर सिंह हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. प्रशासकीय राजवट सुरू असल्याने आयुक्तांवर मोठी जबाबदारी आहे. आयुक्त सिंह हे बुधवार दि. २३ नोव्हेंबर ते दि. २६ नोव्हेंबर पर्यंत रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देणे गरजेचे होते. त्यानुसार महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त-१ प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडे आयुक्तांचा तात्पुरता पदभार सोपविला आहे.
प्रशासकीय राजवटीत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दर मंगळवारी स्थायी समितीची बैठक होते. मात्र, आयुक्त सिंह मंगळवारी मंत्रालयात असल्याने स्थायी समितीची बैठक झाली नाही. स्थायीची बैठक पुढील आठवड्यातच होण्याची शक्यता आहे.
















