न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : थेरगावमधील दगडू पाटीलनगर येथील वहिनी साहेब काॅलनीमध्ये नगरसेवक कैलास बारणे यांच्या प्रयत्नातून पिण्याच्या पाण्याची नवीन पाईप टाकण्याच्या कामाचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
प्रभागातील नागरिकांची पाण्याअभावी फरपट होत असल्यामुळे अनेक दिवसांपासून या कामाचा पाठपुरावा चालू होता. आज या कामास प्रत्यक्ष मंजुरी मिळून सुरुवात झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी नगरसेवक अभिषेक बारणे, नगरसेविका अर्चना बारणे, मनिषा पवार, जालिंदर बारणे पा. व कैलास बारणे युवा मंचाचे कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
















