न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- कमी झालेले क्षेत्र प्रांत यांच्या आदेशाप्रमाणे वाढवुन त्याची सातबाऱ्यावर (७/१२) नोंद होण्यासाठी आरोपी महिला मंडल अधिकारी हिने वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ती लाच रक्कम (दि ६) रोजी दु. २.०० वा. चे सुमारास आढले बुद्रुक येथील तलाठी कार्यालयात स्विकारली.
याप्रकरणी फिर्यादी मारुती बबन आडकर (वय ४८ वर्षे, रा. केवरे वसाहत, लोणावळा) यांनी आरोपी लोकसेवक महिला मंडल अधिकारी, खाजगी इसम संभाजी नारायण लोहोर (वय ५२ वर्षे, भडवली, शिवली ता. मावळ) यांच्या विरोधात शिरगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.















