- वकिलांची राज्याचे महसूल मंत्री तथा नोंदणी महानिरीक्षकांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसेंबर २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरातील महसूल विभाग, सह दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयात येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या माजी सचिव कांता बाळासाहेब गोर्डे यांनी निवेदन दिले. त्यावर महसूल मंत्री विखे पाटील यांनी नोंदणी महानिरीक्षकांना वकिलांच्या अडचणी सोडविण्याच्या संदर्भात निर्देश दिले होते. नोंदणी महानिरीक्षकांनी वकिलांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांना वकिलांकडून पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन पिंपरी चिंचवडच्या सचिव अॅड. कांता गोरडे, पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोरखनाथ झोळ, माजी अध्यक्ष किरण पवार, अॅड. अल्पना रायते, पुणे बारच्या माजी सचिव अॅड. रुपाली वाघेरे, अॅड. प्रभा तरस/ फुगे, अॅड. विभा सिंग, अॅड. कांता गोरडे, पिंपरी चिंचवड बारचे सहसचिव मंगेश नढे, खजिनदार विश्वजित काळजे आदी उपस्थित होते.
सह दुय्यम निबंधक कार्यालयात होणारे सततचे सर्व्हर डाऊन, खरेदीखत, सोडविण्यासाठी इतर दस्तातील कायदेशीर तरतुदी आणि उपाययोजना करण्याचे त्रुटी सांगत वकिलांनाच दस्त तयार करण्याचे व ड्राफ्टिंगचे अधिकार देण्यात यावेत अशी मागणी वकिलांनी केली होती. सह दुय्यम निबंधक कार्यालयात महिला वकिलांसाठी सुविधा, पिंपरी चिंचवड विभागात सह दुय्यम निबंधक कार्यालयांची संख्या वाढविणे, तसेच कार्यालयात इतर सुविधा निर्माण करण्याची मागणीही वकिलांकडून करण्यात आली होती.


















