न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- ताथवडेतील वॉशिंग सेंटरमध्ये वॉशिंगसाठी ८०,००० रुपये किंमतीची बुलेट (GJOS/EW7272) गाडी आली होती. दरम्यान आरोपी अनोळखी व्यक्तीने फिर्यादीच्या कामगारांचा विश्वास संपादन केला. आरोपीने वॉशिंग सेंटरवरील कामगाराला वॉशिंगसाठी आलेली बुलेट गाडी घेण्यास भाग पाडुन, वाकड ब्रिज जवळुन वॉशिंगसाठी त्याची फोर व्हिलर गाडी आणण्याचा बहाना केला. फिर्यादीच्या कामगाराकडून वाकड ब्रिजजवळ बुलेट गाडी घेत वडिलांना घेऊन येतो असे सांगत, फिर्यादीच्या कामगाराला तिथेच सोडत आरोपीने बुलेटसह पोबारा केला.
हा प्रकार (दि. १२) रोजी सकाळी १०.०० वा चे सुमा ॲटो ग्लो कार केअर वॉशिंग सेंन्टर, स्टेईन हॉटेल शेजारी, मंबई बैंगलोर हायवे रोडलगत, ताथवडे येथे घडला.
फिर्यादी राजेश अरुण जाधव (वय ३० वर्षे, रा. पवार यांची रुम, स्कायस्क्रॅपर लेबरकॅम्प जवळ, ताथवडे, मुळपत्ता- जिजाबाई भोसले मार्ग, टेंन्डीसकॅम्प, निलकंठेश्वर रहिवाशी सेवा संघ, डी/२२, मानखुर्द बेस्ट, मुंबई) यांनी आरोपी अनोळखी इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















