न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- मोबाईलवर ma electricity power will be disconnected 10.30 pm because your bill not updated contact call celectricity (९३८२८३१२६९) असा मॅसेज आरोपीने फिर्यादीच्या हॉटसअपवर केला. तसेच त्याच (९३८२८३१२६९) मोबाईलवरुन फोन करुन इलेक्ट्रीसिटी बोर्डातुन बोलत असल्याचे सांगितले.
जुन लाईट बिल अपडेट करायचे असल्याचा बहाणा करीत फिर्यादीचा क्रेडीट कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, सीव्हीव्ही नंबर प्राप्त केला. त्यांना प्लेस्टोअर अॅपवरुन क्विक सपोर्ट अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. फिर्यादीची १,६९,६६२ रुपयांची ऑनलाईन फसवणुक केली आहे.
ही घटना (दि. १/८/२०२२) रोजी सकाळी १०.२० ते रात्री ७.३० वा चे दरम्यान धर्मा अपार्टमेंट, ए बिल्डींग, फ्लॅट नंबर १०, पिंपरी येथे घडली. फिर्यादी दिपक जगुमल तराणी (वय ४७ वर्षे, रा. पिंपरी) यांनी आरोपी मो. नं. ६२००३५१२३२ व ९३८२८३१२६९ धारक अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.


















