न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- गो शाळेतील मरण पावलेला घोडा गायरान जमिनीत गाडण्यासाठी जेसीपीचा ड्रायव्हर माउली उर्फ निशांत मेगळे यांच्यासह फिर्यादी घटनास्थळी गेले होते.
त्यावेळी तिथे फिर्यादीच्या भावकीतील आरोपी व्यक्तीने मरण पावलेला घोडा गाडण्यास फिर्यादीस मज्जाव केला. फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपी फिर्यादीच्या अंगावर धावून आला. त्यांना शिवीगाळ करीत आरोपीने हातातील लोखंडी गजाने फिर्यादीच्या डोक्यात मारून जबरी दुखापत केली, असे फिर्यादी म्हटले आहे.
ही घटना (दि. १५) रोजी रात्री ८.४५ वा. गायरान जमिन, धामणे ता. मावळ) येथे घडली. फिर्यादी हनुमंत मारुती गराडे (वय ६० वर्ष, रा. धामणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे) यांनी आरोपी शरद प्रकाश गराडे (रा. धामणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















