न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- डॉकमध्ये लोडींग आणि स्टोरेज दरम्यान वेंडर कंपनीच्या आसोसियेट्स आरोपी कामगारांनी फिर्यादी अॅमेझॉन कंपनीचा विश्वासघात केला. कंपनीतील ६ मोबाईल व १ हेडफोन असा एकुण ७७,१९३ रु. किमतीचा ऐवज चोरून नेला.
ही घटना (दि. १०/१०/२०२१ ते दि. १८.१०.२०२१) या कालावधीत अॅमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रा. लि. कंपणी, म्हाळुंगे ता. खेड, जि. पुणे) येथे घडला.
फिर्यादी पंकज बाबुराव धोत्रे (वय ४० वर्षे, रा. बी १०३, नमोविहार, हांडेवाडी, रोड, हडपसर) यांनी आरोपी अवधुत गारगोट, अदित्य बालटकर, विशाल जाधव (पुर्णनाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण (महाळुंगे चौकी) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















