न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च) :- शिवशाही व्यापारी संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी रमेश किसन दाखले यांची निवड झाली आहे. शिवशाही व्यापारीसंघ संघटक रविकिरण घटकार यांनी केलेल्या सुचनेनुसार व प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील यांनी दिलेल्या अनोमोदनाने त्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांना नुकतेच निवडीचे पत्र शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिले आहे. तसेच व्यापारीवर्ग सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी कटिबध्द राहण्याच्या सुचना केल्या आहेत.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर, रविकिरण घटकार, तेजस दाखले, आनिकेत थोरात, दत्ता गिरी, मारूती मस्के, आशिष वाळके, प्रदिप दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.











