न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२२) :- स्पा सेंटरच्या नावाखाली पिडीत महिलांना वेश्या व्यवसायाकरिता भाग पाडले. त्यांना पैशांचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षास मिळाली.
पोलिसांनी (दि. १७) रोजी सायंकाळी ६. ४० वा. सुमा काईट स्क्वेअर, चौथा मजला, ऑफीस नं. ४०८, वाकड हिंजवडी रोड, हिजवडी येथील स्पामधील रुम नं ४ मध्ये छापा मारला.
आरोपी स्पा मालक अजित शंकर गोसावी (वय ४८ वर्षे रा. प्लॉट नंबर ४३. स्वामी बंगलो, महानगर पालिकेच्या टाकीजवळ, सिंहगड रोड, धायरी फाटा, धायरी), स्पा मॅनेजर सोनुकुमार विंदयाचल कनोजिया (वय २२ वर्षे रा. रमेश वांजळे यांच्या चाळीमध्ये, रमेश वांजळे ऑफिसमागे, वारजे माळवाडी), यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, दोन मोबाईल फोन असा एकुण ३७,९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
















