न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२२) :- पिंपळे गुरव येथे भरधाव दुचाकीवर फोनवर बोलणं चालकाच्या जीवावर बेतलं आहे. या घटनेत स्कुल बसच्या चाकाखाली येऊन तरुणाचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास पिंपळे गुरवच्या काटे पुरम बॅडमिंटन हॉल च्या समोर घडला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शैलेश गजानन जगताप (वय- २९) रा. पिंपळे गुरव अस अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दुचाकीवरून रामकृष्ण मंगल कार्यालयाहून काटे पुरम चौकाच्या दिशेने जात होता. भरधाव दुचाकी असतानाही शैलेश फोनवर बोलत होता. उजव्या हातात दुचाकीच हँडल तर दुसऱ्या हातात मोबाईल, तो कोणाशी तरी बोलत होता. तेवढ्यात बॅडमिंटन च्या समोर असलेल्या स्पीड ब्रेकर च्या पट्ट्यावरून तो थेट भरधाव स्कुलबसच्या चाकाखाली गेला. यात त्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
















