न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२२) :- ‘ वडगांव येथील बांधकाम साईटचा वाद मिटवून देतो ‘ असे दोघे आरोपी फिर्यादीला म्हणाले. फिर्यादी ऑफिसमध्ये व्यवसाय पार्टनर तसेच कामगारांसह बसले होते तेव्हा आरोपी तिथे आले. ५० लाख रुपये रोख व १६४०० स्क्वेअर फुट, बांधकाम क्षेत्र, वडगांवचे बांधकाम साईटवर अशी मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे दिले नाही तर, त्यांना काम करु देणार नाही व त्यांना कायमचा संपवून टाकील, अशी आरोपींनी धमकी दिली. तसेच त्या दोघांनी फिर्यादीकडे रागाने पाहत ” तुला बघून घेतो, तु काम कसे करतो ” असे म्हणाले. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याच्या मोबाईलवरून व्हॉटसअप मॅसेज करीत धमकी दिली. प्रोजेक्टच्या आधारे खंडणीची मागणी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ९/३/२०२२) रोजी सकाळी ११.३० ते १२.०० वा. चे सुमारास गारवे हुंडायी, सर्व्हे नंबर १३६/१/अ/४, वाकड येथील ऑफिसमध्ये तसेच व्हॉटसअपवर घडला.
फिर्यादी विनायक किशोर गारवे (वय ३९ वर्षे, रा. घर नंबर ६२६/२१. नवी सांगवी) यांनी आरोपी सोमनाथ लाहोट (वय अंदाजे ४० वर्ष, रा. साई रेसिडेन्सी, तळेगांव दाभाडे, रोहन हॉटेल शेजारी, तळेगांव चाकण रस्ता, तळेगांव), त्यासोबतचा अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















