न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ डिसेंबर २०२२) :- ‘ तुला आता सोडत नाही ‘ असे म्हणत आरोपींनी फिर्यादीच्या संस्थेच्या पत्र्याच्या शेडला जोरात धक्का देऊन पत्र्याच्या दरवाजाचे नुकसान केले. फिर्यादीच्या अंगावर धावून जात गचंडी पकडुन ‘ तुलाच जास्त मस्ती आली आहे, तुला बघुन घेतो ‘ असे म्हणत फिर्यादीसोबत असणाऱ्या व्यक्तीलाही वाईट वाईट शिवीगाळ केली. ‘ मी येथेच थांबुन राहणार ‘ असे म्हणत फिर्यादीच्या जागेचा ताबा घेवुन बळजबरी अतिक्रमण करीत फिर्यादीच्या संस्थेच्या रुमचे कुलूप तोडुन आतमध्ये प्रवेश केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.२०) रोजी ५.३० वा चे सुमारास सर्व्हे नं. ८६/२, रावेत गावठाण येथे घडला. फिर्यादी पुंडलीक नागु पालेकर (वय ७६ वर्षे, रा. सेक्टर २५ प्लॉट नं. ३७८ सिंधुनगर प्राधिकरण) यांनी आरोपी प्रविण विठठल खानेकर (रा. वनदेव नगर कॉलनी, लेन नं २, सदगुरु सदन, आनंद हॉस्पीटल जवळ, थेरगाव फाटा, डांगे चौक), महीला आरोपी, प्रकाश विठ्ठल खानेकर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.