न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२२) :- फेरीवाला म्हणून फिर्यादी हे मिक्सर दुरुस्तीचे काम करतात. मिक्सर दुरुस्तीसाठी फिरत असतांना आरोपीने फिर्यादीस ‘ मी इथला दादा आहे, माझ्या एरीयामध्ये धंदा करायचा तर मला हफ्ता दिला पाहिजे ” असे म्हणत त्याच्या दोन मित्रांसह फिर्यादीला धमकावुन, मारहाण केली.
फिर्यादीकडून ६५०० रुपये रोख रक्कम काढुन घेतली. तसेच फिर्यादीच्या मोबाईलमधील फोन पे अॅपचा पीन क्रमांक घेवुन ठिकठिकाणी स्कॅन करून ६००० रुपयांची खरेदी करून आरोपी पळुन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १९) रोजी दुपारी ४.३० वा. ते ६.३० वा. दरम्यान कुणाल हॉटेल मागे, गल्लीत, महर्षि स्कुलजवळ काळेवाडी येथे घडली. फिर्यादी अरविंद कुमार रामजीयावन त्रीपाठी (वय ३० वर्षे, रा. दत्ता काटे यांच्या घरात भाड्याने, लेन नं. ५, दगडु पाटील नगर, थेरगांव) यांनी आरोपी पवन जाधव व इतर दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















