न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२२) :- स्वयंपाक करत असताना फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला आवाज देत कशावरून भांडणे झाली, असे विचारले. तेव्हा आरोपी व त्याचा मित्र तसेच सहआरोपी यांनी फिर्यादीला घराबाहेर नेले.
आरोपीने फिर्यादीला पाठीमागुन पकडून धरले. सहआरोपी व आरोपीचा मित्र याने फिर्यादीला हातापायाने मारहाण करीत तिथे पडलेला लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात, हातावर मारुन जखमी केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २०) रोजी रात्री ९.०० वा सुमारास गुप्ता बिल्डींगच्या खाली, पत्राशेडच्या बाजूला, चाकण येथे घडला. फिर्यादी विजय सत नारायण यादव (वय ३५ वर्षे, रा. गुप्ता बिल्डींग, चक्रेश्वर रोड, चाकण) यांनी आरोपी दिपक दलाल बिसास (वय ३८ वर्षे), बिस्वजीत लेटनिर्मल दास (वय ५२ वर्षे दोन्ही रा. गुप्ता बिल्डींग यांचे बांधकमा साईटवर चाकण) व त्याचा मित्र (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















