न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२२) :- फोटो काढण्यासाठी फिर्यादी हे मित्र आणि नातेवाईकांबरोबर पालिकेच्या गार्डनमध्ये गेले होते. फोटो काढत असताना तेथे आलेल्या तीन अनोळखी आरोपी यांनी फिर्यादीस फोटो काढण्यास मनाई केली. फिर्यादी यांनी त्यांचे ऐकले नाही म्हणुन त्यांनी मिळुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपीने तेथे पडलेला दगड उचलून फिर्यादीचा चुलत भाऊ याच्या डोक्यात मारुन त्यास गंभीर जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि २२) रोजी दुपारी ३.३० वा. सुमारास मनियार इंडस्ट्रिज कंपनीजवळील महानगरपालिकेचे गार्डन, एम.आय.डीसी. भोसरी येथे घडली.
फिर्यादी लक्ष्मण कालुसिंग सोनार (वय २० वर्षे, रा. विजय सुपर मार्केट जवळ, लांडगेनगर, भोसरी) यांनी आरोपी योगेश परियार (वय अंदाजे २५ वर्षे), टेकराज सोनार, राजेश सोनार (वय अंदाजे २० ते २५ वर्षे, सर्व रा. जे. ब्लॉक एम.आय.डि.सी. भोसरी, पुर्णनाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















