न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२२) :- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिट जवळ आज शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भरधाव कारची ट्रक व रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुभाजकाला जोरदार धडक बसली.
या अपघातात चालक सुर्यकांत कांबळे (रा. कर्नाटक) याचा मृत्यू झाला अपघातग्रस्त ट्रकने तीन टन वजनाच्या ६ ते ७ काँक्रिट बॅरिकेड्सला ठोकर मारली आहे. ट्रकमधील सिमेंटच्या गोण्या दूरवर विखरून पडल्या होत्या.
आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस बोरघाट, लोकमान्य आरोग्य सेवा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, AFCONS ची यंत्रणा, आर. टी. ओ. यांनी अपघातग्रस्तांसाठी मदतकार्य केले.















