न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०२२) :- मोबाईलवरील इंन्स्टाग्राम अॅपवर फिर्यादी आणि आरोपींची ओळख झाली. आरोपीने फिर्यादीशी महिनाभर फोनवरुन चॅटींग करीत फिर्यादीला भेटण्यासाठी बोलावले. लॉजवर फ्रेश होण्यासाठी नेले. फिर्यादीस लग्नाचे अमीष दाखवुन फिर्यादीबरोबर बळजबरीने शारिरीक संबंध केला. त्यानंतर ‘ तु जर सदरबाबत कोणास काही एक सांगितल्यास तुला व तुझ्या घरच्यांना मारुन टाकील ‘ अशी धमकी दिली. फिर्यादीने घाबरुन कोणास काही एक सांगितले नाही. दरम्यान फिर्यादी आरोपीपासुन ५ महिन्याची गर्भवती राहिली असल्याने तक्रार दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना जुलै २०२२ (तारीख ११ व १२ अंदाजे) लांडेवाडी चौक, भोसरी येथे रात्री ११. ३० वा ते (दि. १३/०७/२०२२) रोजी सकाळी ११.०० वा. च्या सुमारास घडली.
१९ वर्षीय महीला फिर्यादीने आरोपी राजु मुसाळे (वय २० वर्षे, पुर्णनाव माहिती नाही रा. उरुळीकांचन, हडपसर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.















